जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणी केली जिव्हारी लागणारी टीका?

जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणी केली जिव्हारी लागणारी टीका?

Harshada Shinkar | Updated on: Dec 07, 2023 | 2:52 PM

अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटावरून टीका केली. तर जितेंद्र आव्हाड यांनीही एक फोटो ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. या वार-पलटवार होत असताना अजित पवार गटातील एका नेत्यानं उडी घेतली.

मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटावरून टीका केली. तर जितेंद्र आव्हाड यांनीही एक फोटो ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. या वार-पलटवार होत असताना अजित पवार गटातील एका नेत्यानं उडी घेतली. इतकंच नाहीतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल करताना या नेत्यानं अभिनेत्री राखी सावंत यांच्याशी थेट तुलना केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजितदादा पवार यांच्याबाबत वक्तव्य करत असतात. मात्र त्यांच्या एवढ्या गोष्टी आमच्याकडे आहेत की, दादा मला माफ करा, असं म्हणायची वेळ त्यांच्यावर येईल, असं वक्तव्य करत सूरज चव्हाण यांनी जिव्हारी लागणारी टीका त्यांनी केली आहे.

Published on: Dec 07, 2023 2:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us