‘निणंद्याला बारा बुद्ध्या’, खोचक म्हणीतून कायंदे यांच्यावर सुषमा अंधारे यांचा पलटवार

‘निणंद्याला बारा बुद्ध्या’, खोचक म्हणीतून कायंदे यांच्यावर सुषमा अंधारे यांचा पलटवार

aslam shanedivan | Updated on: Jun 20, 2023 | 8:26 AM

त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना टोला लगावला होता. तसेच बाहेरून येऊन नेते आमच्या देवदेवांविषयी बोलतात हे पटत नसल्यानेच बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं देखील कायंदे म्हणाल्या होत्या. त्यावरून आता कायंदे यांच्या आरोपांना सुषमा अंधारे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना टोला लगावला होता. तसेच बाहेरून येऊन नेते आमच्या देवदेवांविषयी बोलतात हे पटत नसल्यानेच बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं देखील कायंदे म्हणाल्या होत्या. त्यावरून आता कायंदे यांच्या आरोपांना सुषमा अंधारे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एकादशीला मटण खाणाऱ्यांनी आम्हांला हिंदुत्व शिकवू नये. माझ्या गावाकडे म्हण आहे, निणंद्याला बारा बुद्ध्या. ज्याला नांदायचं नाही ते बारा कारणं सांगत असतात, असंही अंधारे म्हणाल्या. तर गद्दार, खोकेवाले असं म्हणणाऱ्या मनिषा कायंदे अचानक का बदलल्या? जाहीर कार्यक्रमांमध्ये त्या मला मला वाघिण म्हणत होत्या. अचानक त्यांना कोणतं हिंदुत्व आठवलं असाही टोला अंधारे यांनी कायंदे यांना लगावला आहे.

Published on: Jun 20, 2023 8:26 AM
Follow Us