Sushma Andhare Press | ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा; सुषमा अंधारेंचा महायुतीवर हल्लाबोल

| Updated on: Mar 27, 2026 | 4:55 PM

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला असून, या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आल्याचा आरोप दिशाभूल करणारा आहे.

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला असून, या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, काही नेत्यांचे फोटो खरातसोबत समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आल्याचा आरोप दिशाभूल करणारा आहे. अंधारे म्हणाल्या की, 2020 मध्ये मीरगाव ग्रामसभेने पाणीपुरवठ्यासंदर्भात ठराव केला होता. प्रति व्यक्ती 30 लिटर पाणी देण्याचा निर्णय ग्रामसभेच्या शिफारशीवर आधारित होता. हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी शिफारस केली होती, तर त्यास मंजुरी तेव्हाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपसमितीकडून देण्यात आली होती. त्या म्हणाल्या, हा विषय थेट मुख्यमंत्र्यांकडे येत नाही. जर नंतर पाईपलाईन वळवण्यात आली असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Published on: Mar 27, 2026 04:55 PM
Follow Us