West Bengal CM Oath | अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री

West Bengal CM Oath | अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री

| Updated on: May 08, 2026 | 5:42 PM

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले. 294 सदस्यीय विधानसभेत भाजपने बहुमताचा आकडा पार करत मोठे यश मिळवले, तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला. या निवडणुकीत टीएमसीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला असून, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली.
दरम्यान, सुवेंदू अधिकारी हे 2020 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. त्याआधी ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. अनेक वर्षे टीएमसीमध्ये काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक बनले.
सुवेंदू अधिकारी यांच्या निवडीमुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, आता पुढील राजकीय घडामोडीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: May 08, 2026 05:42 PM
Follow Us