मोठी बातमी! छत्रपती संभाजीराजे यांची 2024 च्या निवडणुकिवरून मोठी घोषणा

मोठी बातमी! छत्रपती संभाजीराजे यांची 2024 च्या निवडणुकिवरून मोठी घोषणा

aslam shanedivan | Updated on: Jul 13, 2023 | 8:22 AM

यादरम्यान त्यांनी आपण राजकिय पक्षांना पर्याय देणारी संघटना लोकांना देऊ असे म्हटल होतं. त्याप्रमाणे त्यांनी आता मैदानात उतरण्याची पुर्ण तयारी केली असून 2024 च्या निवडणुकिवरून मोठी घोषणा केली आहे.

पुणे : स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात दौरे करत संघटनेची बंधणी करत आहेत. यादरम्यान त्यांनी आपण राजकिय पक्षांना पर्याय देणारी संघटना लोकांना देऊ असे म्हटल होतं. त्याप्रमाणे त्यांनी आता मैदानात उतरण्याची पुर्ण तयारी केली असून 2024 च्या निवडणुकिवरून मोठी घोषणा केली आहे. यावेळी संभाजी राजे यांनी 2024 च्या निवडणुकित आपल्या स्वराज्य संघटनेचे उमेदवार हे दिसतील असे म्हणत रणशिंग फुंकले आहे. तर सध्याच्या सुरू अशलेल्या राजकिय गोंधळावर भाष्य करताना राजकारणात सध्य्या पोरखेळ पहायला मिळत असून कोण कोणत्या पक्षात आहे. राज्यात विरोधी पक्ष आहे की नाही अशी अवस्था झाली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यातपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विदर्भात सत्ताधाऱ्यांसह प्रमुख विरोधकांना आता स्वराज्य संघटनेचे मोठं आव्हान असणार आहे.

Published on: Jul 13, 2023 8:22 AM
Follow Us