‘केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला’, कुणाची खोचक टीका?

| Updated on: Apr 24, 2024 | 2:19 PM

काल परवा पर्यंत दहशतवादी, दादागिरी करणारे नारायण राणे असं समीकरण मांडणारे दीपक केसरकर यांना एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू असं स्वप्न पडलं अशी टीका ठाकरे गटाच्या खासदाने दिपक केसरकरांवर केली आहे. बघा काय केला हल्लाबोल?

Follow us on

नारायण राणे यांच्यासाठी दीपक केसरकर व्हॅनिटी घेऊन प्रचार करत आहेत. राणे आणि केसरकर एकाच व्हॅनिटीमधून एकत्रित प्रचार करणार हे सिंधुदुर्गाचं दुदैव असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी केली आहे. तर काल परवा पर्यंत दहशतवादी, दादागिरी करणारे नारायण राणे असं समीकरण मांडणारे दीपक केसरकर यांना एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू असं स्वप्न पडलं अशी टीका विनायक राऊत यांनी दिपक केसरकरांवर केली आहे. दीपक केसरकर यांच्यावर एवढी आपत्ती येईल, असं वाटलं नव्हतं. त्याच्या कुंडलीत राहू बसला असून एक यज्ञ घाला, असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय. दीपक केसरकर यांच्या बुध्दीची कीव येते असंही राऊत यावेळी म्हणाले. तर व्हॅनिटी व्हॅनवरून देखील दीपक केसरकर यांना विनायक राऊत यांनी लक्ष्य केलं आहे.