Sushma Andhare Video : ‘नाक घासा, माफी मागा… अन्यथा बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी’, सुषमा अंधारे नीलम गोऱ्हेंवर भडकल्या

Sushma Andhare Video : ‘नाक घासा, माफी मागा… अन्यथा बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी’, सुषमा अंधारे नीलम गोऱ्हेंवर भडकल्या

Harshada Shinkar | Updated on: Feb 24, 2025 | 5:45 PM

उद्धव ठाकरेंच्या शिवसेने दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंच्या विधानावर भाष्य करताना त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेने दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंच्या विधानावर भाष्य करताना त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना आव्हान देत उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप कोर्टात सिद्ध करा, नाहीतर नाक घासून माफी मागा, असं म्हटलंय. इतकंच नाहीतर सुषमा अंधारे यांनी मला बोलायला वेळ आणू नका, नाहीतर आतापर्यंत काय काय केलं या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील, असा इशारच सुषमा अंधारे यांनी दिल्यात. पुढे त्या असंही म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांचं कर्तृत्व नसताना त्यांनी पक्षात अनेक पदं भूषवली. मला वेळ आणू नका, भारिपमध्ये असताना तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं मला या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील, असेही सुषमा अंधारेंनी म्हटले. तर नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एस एफ आय मधून केली. नंतर भारिपमध्ये उडी मारली. प्रकाश आंबेडकरांमुळे त्यांना ओळख मिळाली. इमानदारी, प्रामाणिकपणा हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नाही. आंबेडकरांशी त्यांनी बेईमानी केली. शरद पवारांकडे आणि त्यांच्या पक्षाशी बेईमानी केली, मग त्या आमच्याकडे आल्या, असं म्हणत अंधारेंनी गोऱ्हेंवर खरपूस समाचार घेतला.

Published on: Feb 24, 2025 5:45 PM
Follow Us