का सोडली शिवसेना? धमक्यांमुळे की खोक्यांमुळे… संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल

का सोडली शिवसेना? धमक्यांमुळे की खोक्यांमुळे… संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल

Harshada Shinkar | Updated on: Jan 31, 2023 | 12:43 PM

शिंदे गटाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना का सोडली एकदाच स्पष्ट करावं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला केला रोखठोक सवाल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान देत खुलासा करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी शीतल म्हात्रे यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत शिंदे गटाने शिवसेना हा पक्ष का सोडला हे एकदा स्पष्ट करावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाला महाविकास आघाडी नको म्हणून त्यांनी शिवसेना सोडली का? हिंदुत्वासाठी ते पक्ष सोडून गेले का? खोके मिळाले म्हणून सोडून गेले? धमक्यांना घाबरून गेले? प्रत्येक वेळी ते भूमिका बदलतात म्हणून एकदा स्पष्ट करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राऊत असे म्हणाले की, दहिसर येथील भाषणाचा आधार घेत शीतल म्हात्रे यांनी गुवाहाटीला जे पळून गेले होते त्यांना दंडुक्याने मारा, त्यांच्या पार्श्वभगावर फटके द्या असं शीतल म्हात्रे म्हणाल्या होत्या आणि नंतर त्याच गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाला मिळाल्या. असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत शीतल म्हात्रे यांना डिवचलं आहे.

Published on: Jan 31, 2023 12:13 PM
Follow Us