भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?

भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?

| Updated on: Mar 22, 2026 | 3:05 PM

भोंदूबाबा अशोक खरात याची नाशिकच्या स्थानिक क्राईम ब्रँच आणि एसआयटी मार्फत चौकशी सुरु आहे. काल सात तास चौकशी झाल्यानंतर आज खरात याला अचानक अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटी मार्फत चौकशी सुरु आहे. अशोक खरात याने दैवी आशीर्वाद आणि चमत्काराने महिलांना फशी पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्याचे ५८ व्हिडीओ उघडकीस आले असून त्यात तो महिलांशी किळसवाणे प्रकार करत असल्याचे दिसत आहे. या भोंदूबाबाची नाशिकचा पोलिस क्लब हिमांशू येथे आतापर्यंत चौकशी सुरु होती. मात्र, एसआयटीने अशोक खरात याला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे. खरात याच्या फार्म हाऊसच्या कर्मचाऱ्यांची देखील पोलिस चौकशी करत आहेत. तसेच त्याच्या मंदिराच्या पुजाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे. नाशिकची स्थानिक गुन्हे शाखा आणि एसआयटी मार्फत त्याची चौकशी सुरु होती. एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते या देखील त्याची चौकशी करत आहेत. या चौकशीतून काय काय पुढे येते हे आता पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Published on: Mar 22, 2026 03:04 PM
Follow Us