Mumbai Siddhivinayak Temple | संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

Mumbai Siddhivinayak Temple | संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

| Updated on: Mar 06, 2026 | 11:31 AM

संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी हजारो भक्त मंदिरात दाखल झाले असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. आज सकाळपासून मंदिरात विधिवत पूजा आणि धार्मिक विधी पार पडत आहेत.

संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी हजारो भक्त मंदिरात दाखल झाले असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. आज सकाळपासून मंदिरात विधिवत पूजा आणि धार्मिक विधी पार पडत आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली असून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. संकष्टी चतुर्थी हा गणेशभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान गणेशाची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे मुंबईसह आसपासच्या परिसरातूनही मोठ्या संख्येने भाविक सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.

Published on: Mar 06, 2026 11:31 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us