Narendra Modi | आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे, निवडणूक आयोगाचे आभार मानले. देशातील विविध राज्यांच्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस "ऐतिहासिक आणि अभूतपूर्व" असल्याचे म्हटले आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे, निवडणूक आयोगाचे आभार मानले. देशातील विविध राज्यांच्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस “ऐतिहासिक आणि अभूतपूर्व” असल्याचे म्हटले आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
दिल्लीतील पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी या यशामागे जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची अथक मेहनत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी स्वतःलाही एक कार्यकर्ता मानत सर्वांसोबत या विजयाचा आनंद साजरा केल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी या निकालाला देशाच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. विविध राज्यांमध्ये मिळालेल्या यशामुळे पक्षाचा विस्तार देशभरात होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या विजयामुळे आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, भाजपच्या वाढत्या प्रभावावरही या निकालातून शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, देशभरात विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
