मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. TVK पक्षाने मंगळवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला.
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. TVK पक्षाने मंगळवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्षाने दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. दरम्यान, राज्यपालांकडून परवानगी मिळाल्यास गुरुवारी चेन्नई येथे शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
234 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी 118 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. TVK कडे सध्या 108 आमदार असून अजून 10 आमदारांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
पक्षाने आपल्या सर्व आमदारांना महाबलीपुरमजवळील एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यामागे आमदारांना एकत्र ठेवणे आणि कोणतीही फूट पडू न देणे हा उद्देश असल्याचे मानले जाते. राजकारणामध्ये निकालानंतर अशा रणनीती नवीन नाहीत. आता पुढील काळात नेमकं काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
