नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा…, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा…, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

Harshada Shinkar | Updated on: Apr 14, 2024 | 5:42 PM

उद्धव ठाकरे हे वेडे आहे. ते दहशतवाद्यांना सुपारी देत असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली होती. नारायण राणे यांच्या टीकेला उबाठाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.. नारायण राणे हा वेडा आहे. त्याचा चेहरा कसा पडलेला आहे दिसतो. त्याच्यावर....

उद्धव ठाकरे हे वेडे आहे. ते दहशतवाद्यांना सुपारी देत असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली होती. नारायण राणे यांच्या टीकेला उबाठाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नारायण राणे हा वेडा आहे. त्याचा चेहरा कसा पडलेला आहे दिसतो. त्याच्यावर काय बोलायचं’, असं म्हणत खैरेंनी टीका केली आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांचा चांगला संबंध होता. बाबासाहेब स्वतः प्रभादेवीच्या घरी यायचे प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते. प्रबंध प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांसोबत चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आहे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितला आहे की दोन नेते, शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आले तर देशाचे चित्र पालटेल. बाबासाहेबांच्या एका घटनेमुळे अनेक लोक ज्यांना जगण्याचं स्थान नव्हतं मात्र ते आयपीएस अधिकारी झाले, असेही बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

Published on: Apr 14, 2024 5:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us