मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची…
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. नाईकांनी त्यांच्या विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये, असे सामंत म्हणाले. मंत्रिमंडळातील निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच कळवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नाईकांनी प्रकल्पांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करावी, असा सल्लाही सामंत यांनी दिला.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या विभागाच्या कामकाजाबद्दल नाईकांनी आपल्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. “वनविभागात काही गोष्टी करत असतील तर त्यांनी मला सांगावे अशी अपेक्षा असू नये,” असे ते म्हणाले. मंत्री म्हणून आपल्या विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला असून, त्याची माहिती केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनाच देण्यास आपण बांधील असल्याचे सामंत यांनी नमूद केले. नाईकांनी प्रकल्पांबाबत असलेल्या शंका किंवा आक्षेप पत्रकार परिषदेतून मांडण्याऐवजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून दूर करावेत, असा सल्लाही सामंत यांनी दिला.
पालकमंत्री म्हणून प्रत्येक प्रकल्पाची माहिती मिळायलाच हवी या नाईकांच्या भूमिकेला सामंत यांनी असहमती दर्शवली. त्याचप्रमाणे, सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या आणि शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवर बोलताना, पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असून, हे अधिकार उदय सामंत यांना दिलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
