इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान

इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान

| Updated on: Jun 28, 2026 | 11:30 AM

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे यवतमाळनंतर आता परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या परभणी दौऱ्याआधी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी बंडखोर खासदारंवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे यवतमाळनंतर आता परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या परभणी दौऱ्याआधी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी बंडखोर खासदारंवर जोरदार हल्लाबोल केला. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत तसेच इतर नेतेही उपस्थित होते.

या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मला विशेष म्हणजे येथिल जनतेची माफी मागायची आहे. त्यांच्यासोबत जो विश्वासघात झाला त्याची मी माफी मागाणार असं त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, इकडच्या जनतेला नेहमीच दग्याचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघातील खासदार पुढे जाऊन काही वर्षात बंडखोरी करतो, त्यामुळे पुढे एक स्थिर खासदार देण्याचं काम आम्ही करू. ही माझी सभा नाही… तर कार्यकर्त्यांशी संवाद साधायला आलो आहे.

Published on: Jun 28, 2026 11:28 AM
Follow Us