आता काही खऱं नाही! लोकशाहीचं… ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?

आता काही खऱं नाही! लोकशाहीचं… ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?

| Updated on: Jun 17, 2026 | 6:32 PM

राज्याच्या राजकारणात जलद घडामोडी घडताना पाहयला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार जवळपास फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याच्या राजकारणात जलद घडामोडी घडताना पाहयला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार जवळपास फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. याबात तज्ज्ञ काय म्हणतात पहा…

उल्हास बापट यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना बापट यांनी म्हटले की, दोन तृतियांश खासदार बाहेर पडले तर त्यांची खासदारकी वाचते. पण मूळ राजकीय पक्षाने मर्ज व्हायचा निर्णय घेतला तर त्याला त्या पक्षाच्या दोन तृतियांश आमदार आणि खासदारांनी मान्यता द्यायला हवी. या प्रकरणात उद्धव ठाकरे काहीच बोललेले नाहीत. 6 लोक बाहेर चालले आहेत. आता हे बरोबर आहे हे सुप्रीम कोर्टाने ठरवायला हवं.

पुढे बोलताना बापट यांनी म्हटले की, भीती दाखवायची, विकत घ्यायची मंत्रिपद द्यायचं या सगळ्या प्रलोभनांमुळे पक्षांतर होत आहेत. याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देणं आवश्यक आहे, मात्र कोर्ट निर्णय देत नाही. त्यामुळे मला असं वाटत की भारताच्या लोकशाहीचे जे पतन चालू आहे याला सर्वात जास्त जबाबदार राजकारणी लोकं तर आहेतच, सर्वोच्च न्यायालय आहे, ज्याच्यावर आपण विश्वास टाकलेला आहे.

Published on: Jun 17, 2026 6:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us