ठाकरेंचे आणखी दोन खासदार….बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 बंडखोर खासदार बुधवारी नवी दिल्ली येथे पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील 6 खासदारांना आपल्या बाजूने वळवल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावती | उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 बंडखोर खासदार बुधवारी नवी दिल्ली येथे पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील 6 खासदारांना आपल्या बाजूने वळवल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेत स्वतंत्र गट स्थापन करण्याचे पत्र सादर केले. तसेच शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडीनंतर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘जैसी करणी वैसी भरणी’ असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’चे समर्थन केले. फुटलेल्या खासदारांनी आपल्या युवा स्वाभिमान पार्टीत यावे, अशी खुली ऑफरही रवी राणा यांनी दिली.
ठाकरे गटात आता फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उरणार असल्याचा दावा त्यांनी केला. आणखी 2 खासदार आपल्या संपर्कात असल्याचेही रवी राणा म्हणाले. हनुमान चालीसा प्रकरणात 14 दिवस तुरुंगात टाकल्याची आठवण करून देत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
