तर त्यांना गाडीसकट पेटवू…बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत.
महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात पक्षातील समर्थाकांमध्ये आक्रोश पहायला मिळत आहे. सध्या पक्ष फुटीच्या या प्रकरणात ‘जर-तरचे’ राजकारण सुरू आहे. कोणतीही गोष्ट अद्याप स्पष्ट झालेली नाही, मात्र अनेक ठाकरे सैनिकांचा राग अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या फुटाफटीच्या प्रकरणातील कॅप्टन संजय देशमुख यांना सांगितलं जात आहे. ठाकरे गटातील सुषमा आंधारे यांनीदेखील आज (१७ जून) पत्रकार परिषदेत असा आरोप केला होता. दरम्यान, ठाकरे गटातील उपतालुकाप्रमुखांनी थेट इशारा दिला आहे. उपतालुकाप्रमुक विजय शेंडगे म्हणाले संजय देशमुखांनी बंडखोरी केलीच तर त्यांना त्यांच्या गाडीसकट पेटवू, शिंदेंच्या गटात गेल्यानंतर त्यांनी वाशिम जिल्ह्यात पाय ठेवू नये’. ठाकरे सेनेतील कार्यकर्ता आणि समर्थकांमधील आक्रोश वाढत असल्याचं पाहयला मिळत आहे.