उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार… ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?

उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार… ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?

| Updated on: Aug 11, 2026 | 3:17 PM

शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेवरून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाकडे 2018ची पक्ष घटना उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र,

शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेवरून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाकडे 2018ची पक्ष घटना उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आयोगाच्या याच निर्णयातील परिच्छेद 132 मध्ये शिवसेना पक्षाची माहिती 2018च्या घटनेनुसार तपासल्याचा उल्लेख असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे.

यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेत विरोधाभास असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिच्छेद 133 मध्ये एकनाथ शिंदे यांना 2018च्या पक्ष घटनेनुसार आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही सरोदे यांनी नमूद केले.

असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्टमधून आयोगाच्या भूमिकेवर टीका केली. कपिल सिब्बल यांनीही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टीव्ही9 मराठीशी बोलताना सरोदे म्हणाले, “निवडणूक आयोग पूर्णपणे खोटारडेपणावर आधारित काम करत आहे.” तसेच “ही स्वायत्त यंत्रणा राहिली नाही. ती बीजेपीची टीम झाली आहे,” असा आरोपही त्यांनी केला. अमित शहांच्या सांगण्यावरून शिंदे यांना पक्षाबाबत निर्णय मिळाल्याचा आरोप सरोदे यांनी केला.

Published on: Aug 11, 2026 3:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us