Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?

Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 17, 2026 | 9:01 PM

कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी संपर्क होत नव्हता, या अमित शहांच्या दाव्यावर उद्धव ठाकरे भडकले आहेत. शहा खोटे बोलत असून ते चकाट्या पिटणारे गृहमंत्री आहेत, असा पलटवार ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातील कोरोना व्यवस्थापन प्रभावी ठरले, तर शहांनी मणिपूर आणि अरुणाचलकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना काळात तत्कालीन उद्धव ठाकरेंशी संपर्क होत नसल्याच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अमित शहा खोटे बोलत असून ते चकाट्या पिटणारे गृहमंत्री आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

शहांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात गुजरातमध्ये सामूहिक चिता पेटल्या, तसे महाराष्ट्रात घडले नाही. महाराष्ट्राने धारावीसारख्या ठिकाणीही प्रभावीपणे कोरोनाचा सामना केला, जे मोदींना थाळ्या पिटून जमले नाही, ते महाराष्ट्राने करून दाखवले. शहांनी चकाट्या पिटण्याऐवजी मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जावे, जिथे लोक आक्रोश करत आहेत आणि शहा त्यांचे फोन घेत नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

अजित पवारांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात शहा यांनी पवारांचे कौतुक करत महायुतीला त्यांच्यामुळे स्थिरता आल्याचे म्हटले होते. यावरही ठाकरेंनी शहांना लक्ष्य करत ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनेच केले होते, आता शहांनी अजित पवारांची माफी मागावी अशी मागणी केली.

 

Published on: Nov 17, 2026 9:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us