Jalgaon | अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचे आंतरराष्ट्रीय पडसाद आता स्थानिक शेतकऱ्यांवरही जाणवू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील केळीच्या एक्स्पोर्टचा व्यापारी बाजार ठप्प झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, 15 दिवसांपूर्वी 2500 रुपयांवर गेली होती, मात्र आता व्यापारी ती 1500 ते 1600 रुपयांवर मागणी करत आहेत.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचे आंतरराष्ट्रीय पडसाद आता स्थानिक शेतकऱ्यांवरही जाणवू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील केळीच्या एक्स्पोर्टचा व्यापारी बाजार ठप्प झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, 15 दिवसांपूर्वी 2500 रुपयांवर गेली होती, मात्र आता व्यापारी ती 1500 ते 1600 रुपयांवर मागणी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. तसेच, केळीच्या बागांवर सतत उन्हामुळे करपा येत असून पिकांचे नुकसान होत आहे. युद्धाच्या आणि हवामान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, शेतकऱ्यांनी सरकारकडे यासाठी भरपाईची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी याची नोंद घेण्याची आणि तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
Published on: Mar 02, 2026 04:06 PM
Follow Us
