Vaishnavi Hagawane Case : येत्या 22 तारखेला काय होणार निर्णय? निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर सुनावणी

Vaishnavi Hagawane Case : येत्या 22 तारखेला काय होणार निर्णय? निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर सुनावणी

Harshada Shinkar | Updated on: Jul 16, 2025 | 8:17 AM

वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात तब्बल 1 हजार 676 पानांचा दोषारोपपत्र सादर केल्यानंतर आता आरोपी निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर बाळाला बेकायदेशीर ताब्यात ठवून त्याची हेळसांड करणे आणि कस्पटे कुटुंबाला (वैष्णवीच्या कुटुंबाला) बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोपी निलेश चव्हाणवर आरोप आहे. तो फरार होता आणि त्याला नंतर नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात वैष्णवीचे पती, सासरे, सासू, दीर, नणंद आणि इतर काही जणांवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात एकूण अकरा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

दरम्यान, निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलै रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीत त्याला जामीन मिळतो की नाही हे स्पष्ट होईल. त्यामुळे २२ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय होणार? नेमका काय निकाल येणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published on: Jul 16, 2025 8:17 AM
Follow Us