Dadasaheb Phalke Award जाहीर झाल्यानंतर वहिदा रेहमान म्हणाल्या, ‘मी त्यांना धन्यवाद देते’

Dadasaheb Phalke Award जाहीर झाल्यानंतर वहिदा रेहमान म्हणाल्या, ‘मी त्यांना धन्यवाद देते’

| Updated on: Sep 27, 2023 | 10:56 AM

VIDEO | ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित, वहिदा रेहमान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ''हा सरकारचा मोठा पुरस्कार आहे. भारत सरकारने हा पुरस्कार मला देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते'

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती बुधवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून दिली आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी धन्यवाद व्यक्त केले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वहिदा रेहमान म्हणाल्या, ‘हा सरकारचा मोठा पुरस्कार आहे. भारत सरकारने हा पुरस्कार मला देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. भारत सरकारने या सन्मानासाठी माझी निवड केली म्हणून मी आनंदी आहे. ज्यांनी माझी या पुरस्कारासाठी निवड केली, त्यांना मनापासून आभार. तर ज्यांनी पूर्ण कारकीर्दीमध्ये माझ्यावर प्रेम केलं, मी माझ्या त्या चाहत्यांचे आभार मानते’

Published on: Sep 27, 2023 10:56 AM
Follow Us