विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी अन् आंदोलन

| Updated on: Feb 27, 2026 | 1:03 PM

महाराष्ट्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी मराठी भाषा दिनानिमित्त आंदोलन केले. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात असल्याचा आणि मराठी शाळा बंद केल्या जात असल्याचा आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारला उपरोधिक शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित केला.

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक आंदोलन केले. महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग धंदे गुजरातच्या चरणी वाहणाऱ्या महायुती सरकारला उपरोधिकपणे मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देणारे बॅनर घेऊन शशिकांत शिंदे, कैलास पाटील, महेश शिंदे, ज्योती गायकवाड, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.

विरोधकांनी मराठी भाषेच्या केवळ गाजावाजा होत असल्याचा आणि 255 मराठी शाळा बंद केल्या जात असल्याचा आरोप केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याचे बॅनर प्रदर्शित केले. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत, विरोधकांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. भाजप आमदारांनी विरोधक मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याचा आरोप केला, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांवरून हल्ला चढवला.

Published on: Feb 27, 2026 01:03 PM
Follow Us