Vijay Wadettiwar | भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल, वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; खरातच्या एन्काऊंटरचीही व्यक्त केली भीती

| Updated on: Mar 25, 2026 | 12:35 PM

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवर यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीचा एन्काउंटर होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. वड्डेटीवर म्हणाले की, या प्रकरणात केवळ सोयीचे मुद्देच समोर आणले जात असून संपूर्ण सत्य लपवले जात आहे.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवर यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीचा एन्काउंटर होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. वड्डेटीवर म्हणाले की, या प्रकरणात केवळ सोयीचे मुद्देच समोर आणले जात असून संपूर्ण सत्य लपवले जात आहे. तपास यंत्रणांकडून लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त केल्याचे सांगितले जात असले, तरी महत्त्वाचा पेनड्राईव्ह अद्याप समोर आलेला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “तो पेनड्राईव्ह समोर आला, तर अनेक धक्कादायक बाबी उघड होतील. कोण-कोण या भोंदूबाबाचे भक्त होते, तसेच कोण-कोण त्याच्या संपर्कात होते, हे स्पष्ट होईल,” असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय, या पेनड्राईव्हमध्ये काही उच्चपदस्थांचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त करत, “दोन ते तीन मंत्र्यांची विकेट जाऊ शकते,” असा गंभीर आरोपही वड्डेटीवर यांनी केला. मात्र, हा पेनड्राईव्ह समोर आणला जाणार नाही आणि संपूर्ण प्रकरण दडपले जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Published on: Mar 25, 2026 12:35 PM
Follow Us