Laxman Hake : हलकट मेला, त्याला काय कमी.., हाकेंच्या पत्नीची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल
Laxman Hake Wife Audio Clip : एकीकडे ओबीसी नेता लक्ष्मण हाके आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात झालेल्या शाब्दिक वादानंतर आता हाके यांच्या पत्नीची शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पत्नीची शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. हाके यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या धायगुडे यांच्या पत्नीला त्यांनी शिवीगाळ केली आहे.
उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यावर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंकडून जोरदार टीका केली जात आहे. या आरोपांनंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्यात वाद टोकाला गेल्यानंतर हाके यांच्याकडून अर्वाच्य भाषा देखील वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या हाके चांगलेच चर्चेत आले आहे. असं असतानाच आता त्यांच्या पत्नीची विजया हाके यांची शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
Published on: Jun 08, 2025 04:31 PM
