West Bengal Election Results | ममता दिदी टाटा गुड बाय!; अमित शाहांचं वक्तव्य व्हायरल, निकालांआधी नेमकं काय म्हणाले होते?

West Bengal Election Results | ममता दिदी टाटा गुड बाय!; अमित शाहांचं वक्तव्य व्हायरल, निकालांआधी नेमकं काय म्हणाले होते?

| Updated on: May 04, 2026 | 12:21 PM

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागणार असून यामध्ये कोणता पक्ष बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कलानुसार सत्तापालट होण्याची शक्यता दिसून येत आहे

आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागणार असून यामध्ये कोणता पक्ष बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कलानुसार सत्तापालट होण्याची शक्यता दिसून येत आहे. निवडणुकीआधी सर्व पक्षीय नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता, या प्रचारदरम्यान अमित शहा यांचं एक वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे.

प्रचारादरम्यान अमित शाहा यांनी सांगितलं होतं की, सकाळी आठ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल, 9 वाजता ईव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात होईल, दहा वाजता पहिला राऊंड, 11 वाजता दुसरा राऊंड आणि एक वाजता मतमोजणी समाप्त आणि ममता दीदी टाटा गुड बाय.

भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: May 04, 2026 12:17 PM
Follow Us