तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC)शी संबंधित एका प्रकरणात सीआयडीने कारवाई केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. टीएमसी आमदारांच्या कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सीआयडीने पक्षाशी संबंधित कार्यालयावर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC)शी संबंधित एका प्रकरणात सीआयडीने कारवाई केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. टीएमसी आमदारांच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सीआयडीने पक्षाशी संबंधित कार्यालयावर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्यांशी संबंधित प्रकरणात तपास सुरू असून, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईच्या वेळी ममता बॅनर्जी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी घटनास्थळी उपस्थित नव्हते. दरम्यान, माजी खासदार सुभाष चक्रवर्ती यांच्यावर तपासात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या वतीने खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पक्षाने या कारवाईवर आक्षेप घेत न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश बराईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही पक्षाच्या दोन राज्यसभा खासदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले असून, सध्या पक्षाकडे 10 खासदार उरल्याचे बोलले जात आहे.
राजकीय वर्तुळात आता तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींविषयी चर्चा सुरू झाली आहे. तसेच, येत्या काही दिवसांत पक्षातील आणखी काही खासदार राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
