मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नी स्नेहाने दाखल केला गुन्हा

मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नी स्नेहाने दाखल केला गुन्हा

| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 1:03 PM

कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह सासू,सासरे पत्नी स्नेहा हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात सून स्नेहा विश्वासराव यांनी तक्रार दाखल केली आहे.