भोंदूबाबा अशोक खरातचा पीए नीरज जाधव आज कोर्टात हजर होण्याची शक्यता, आणखी काय बाहेर पडणार ?

भोंदूबाबा अशोक खरातचा पीए नीरज जाधव आज कोर्टात हजर होण्याची शक्यता, आणखी काय बाहेर पडणार ?

| Updated on: Mar 21, 2026 | 12:02 PM

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे अनेक राजकारण्यांशी लागेबांधे असल्याचे उघड झाले आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याचे सीसीटीव्ही बाहेर काढणारा त्याचा पीए नीरज जाधव याला काल क्राईम ब्रँचने अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याचा पीए नीरज जाधव याला काल सायंकाळी क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलेले आहे. नीरज जाधव यांच्याकडे भोंदूबाबाचे ५८ व्हिडीओ सापडले आहेत. त्याच्याकडे आणखी कोणा-कोणाचे व्हिडीओ आहेत याचे रहस्य नीरज जाधव यांच्या तपासातून उघडकीस येण्याची शक्यता आहे. भोंदूबाबाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याने शिर्डी आणि नाशिक भागात अनेक जमिनी बळकावल्याचेही उघडकीस आले आहे. २०२० साली भोंदू बाबा अशोक खरात याने त्याच्या संस्थानसाठी दारणा धरणातून पाण्याचे कनेक्शन टाकून घेतले होते अशीही माहिती उघडकीस आली आहे. नीरज जाधवकडे अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे सर्व CCTV असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे त्यांच्या चौकशीतून आणखी कोणती माहीती बाहेर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Published on: Mar 21, 2026 11:56 AM
Follow Us