Nagpur Video : तरुणीकडे पाहून भर रस्त्यात तरूणानं नको ते केलं… पुण्यानंतर नागपुरात विकृतीचा कळस, अश्लील हावभावाचा VIDEO व्हायरल

Nagpur Video : तरुणीकडे पाहून भर रस्त्यात तरूणानं नको ते केलं… पुण्यानंतर नागपुरात विकृतीचा कळस, अश्लील हावभावाचा VIDEO व्हायरल

| Updated on: Mar 10, 2025 | 2:40 PM

पुण्यातील शास्त्रीनगर चैकातील सिग्नलवर अश्लील चाळे केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज नागपुरातील सेंट्रल जेल आणि निरी परिसरात एका तरूणाने विकृततेची परिसीमा गाठल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यानंतर आता नागपुरात देखील तरूणाचे भर रस्त्यात अश्लील हावभाव पाहायला मिळाले. तरूणाच्या या कृतीनंतर नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यात एका तरूणीकडे पाहून भररस्त्यात तरूणाने अश्लील हावभाव केले होते. या संतापजक आणि विकृततेचा कळस गाठणारा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तीव्र शब्दात या तरूणावर टीका होत आहे. नागपुरातील सेंट्रल जेल आणि निरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी या विकृत तरूणाचा शोध घेण्यास सुरूवात केली अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी पुण्यात देखील पाहायला मिळाला होता. पुण्यातील शास्त्रीनगर चौकात महिला दिनाच्या दिवशीच महिलांसमोर एका तरूणाने अश्लील कृत्य केलं होतं. सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका तरुणाने भर चौकातच महिलेसमोर अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना देखली सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. या प्रकरणामुळे पुणे शहरात एकच संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला होता.

Published on: Mar 10, 2025 02:33 PM