Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती

Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती

| Updated on: Aug 13, 2026 | 9:27 AM

एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धमकी मिळाल्यानंतर सिद्दीकी यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधत या घटनेची माहिती दिली आहे.

झिशान सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धमकीबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

धमकीचा कॉल नेमका कुठून करण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून संबंधित कॉल ट्रॅक केला जात आहे. तसेच धमकीमागील व्यक्ती कोण आहे आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेचाही पोलिसांकडून आढावा घेतला जात आहे. त्यांच्या सुरक्षेत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार का, याबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Aug 13, 2026 9:27 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us