राणे-मुंडेंच्या वादात विलासराव मुख्यमंत्री, 1999 च्या पुनरावृत्तीची चिन्हं?

महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती 1999 ची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न निर्माण करणारी आहे.

राणे-मुंडेंच्या वादात विलासराव मुख्यमंत्री, 1999 च्या पुनरावृत्तीची चिन्हं?
Follow us
| Updated on: Nov 11, 2019 | 12:41 PM

मुंबई : निवडणुकांपूर्वी शिवसेना-भाजप यांची झालेली युती मुख्यमंत्रिपदावरुन झालेल्या वादामुळे औपचारिक पातळीवर राहिली आहे. भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. आता पुरेसं संख्याबळ जमवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मात्र महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती 1999 ची आठवण करुन देणारी आहे. वीस वर्षांतच इतिहासाची पुनरावृत्ती (1999 Maharashtra Vidhansabha Election) होणार का, असा प्रश्न आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरुन शिवसेनेसोबत त्यांची बोलणी फिस्कटली. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याच्या भूमिकेवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम राहिल्यामुळे भाजपने सत्तास्थापनेस नकार दिला. या राजकीय नाट्यानंतर 1999 ची आठवण झाल्यावाचून राहत नाही.

1999 मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर काय झालं?

1999 च्या निवडणुकीत काँग्रेसला 75, शिवसेनेला 69, राष्ट्रवादीला 58, तर भाजपला 56 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती झाली होती.

त्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणे यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं तर, भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. 1999 मध्ये भाजपने शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र भाजपची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धुडकावून लावली होती.

महासेनाआघाडीच्या ‘पॉवरफुल’ महिला, वायरल फोटोमागील रहस्य काय?

शिवसेनेने सरकारस्थापनेचे प्रयत्न केले. परंतु त्याला यश काही आलं नाही. ही संधी साधत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणुकोत्तर आघाडी स्थापन केली. काँग्रेस राष्ट्रवादी यांचं एकत्रित संख्याबळ 75+58=133 झालं. अपक्ष आमदारांना सोबत घेऊन आघाडीने सरकार स्थापन केलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.

आता पुन्हा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी शिवसेना आग्रही आहे. भाजपकडे आता 105 आमदार आहेत, तर पाठिंबा दिलेल्या अपक्षांसह त्यांचं संख्याबळ 116 वर जातं. शिवसेनेकडे 56 जागा असून पाठिंबा देणाऱ्या आमदारांसह त्यांच्याकडे 64 आमदारांचं संख्याबळ होतं. आघाडीचं बलाबल 98 आहे आणि 28 अपक्ष आमदार आहेत. शिवसेना आघाडीसोबत गेल्यास एकूण संख्याबळ होतं 162.

आता महाराष्ट्रात ‘महासेनाआघाडी’चं नवं त्रिसूत्री सरकार पाहायला मिळणार, की शिवसेनेला शह देऊन पुन्हा आघाडी 1999 ची पुनरावृत्ती करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार (1999 Maharashtra Vidhansabha Election) आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.