महासेनाआघाडीच्या 'पॉवरफुल' महिला, वायरल फोटोमागील रहस्य काय?

प्रणिती शिंदे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, स्मृती शिंदे आणि रश्मी ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महासेनाआघाडीच्या 'पॉवरफुल' महिला, वायरल फोटोमागील रहस्य काय?

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सरकार स्थापन करणार का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील ‘पॉवरफुल’ महिलांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, असा प्रश्न नेटिझन्सना (Political Leader Wives Viral Photo) पडलेला आहे.

सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, प्रणिती शिंदे यांची भगिनी स्मृती शिंदे-श्रॉफ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचा हा फोटो आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित आणि मिताली यांच्या लग्नातील हा फोटो आहे. ‘अमिताली’च्या लग्नात म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईतील सेंट रेजिसमध्ये हा सर्वपक्षीय महिलांचा हा फोटो काढला गेला होता. परंतु नऊ महिन्यांनंतर हा फोटो पुन्हा व्हायरल होण्याचं कारण काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस अनुकूल : सूत्र

भाजपने सत्तास्थापनेचा दावा करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. शिवसेनेकडे पुरेशा संख्याबळाअभावी राज्यात ‘महासेनाआघाडी’ची नांदी होऊ घातल्यामुळे याच तीन पक्षातील महिलांचा हा एकत्रित फोटो व्हायरल होत आहे.

एकीकडे राजकीय शत्रुत्व पाहायला मिळत असलं, तरी अनेक राजकीय नेत्यांचे पक्षापलिकडे ऋणानुबंध पाहायला मिळतात. नेत्यांच्या कन्या, पत्नी याला अपवाद कशा ठरतील? लग्न-सण समारंभांच्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिला राजकारण बाजूला ठेवून गप्पांचे फड जमवताना (Political Leader Wives Viral Photo) दिसतात.

सत्तास्थापनेचं त्रांगडं

भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. आता सत्तास्थापनेसाठी शिवसेना दावा करणार का, बहुमताचा आकडा कसा जमवणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या मतावर ठाम आहेत. शिवसेनेकडे संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतची वेळ असल्यामुळे सर्वांचेच लक्ष शिवसेनेकडे लागले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *