नागपुरात निवडणुकीसाठी इच्छुकांचं 'मिशन उमेदवारी'

भाजप आणि काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करणार आहे (BJP Candidate list). त्यामुळे नागपुरातील काँग्रेस आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांचं 'मिशन उमेदवारी' सध्या जोरात सुरु आहे (Congress Candidate list).

नागपुरात निवडणुकीसाठी इच्छुकांचं 'मिशन उमेदवारी'

नागपूर : भाजप आणि काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करणार आहे (BJP Candidate list). त्यामुळे नागपुरातील काँग्रेस आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांचं ‘मिशन उमेदवारी’ सध्या जोरात सुरु आहे (Congress Candidate list). उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची दिल्ली-मुंबईवारी, बायोडाटा, वशिलेबाजी आणि भेटीगाठीचं सत्र सध्या सुरु झालं आहे (Assembly Elections 2019).

नागपूर शहरात विधानसभेच्या सहा जागा आहेत. या सहाही जागांवर भाजपचे विद्यमान आमदार आहेत, असं असतानाही शहरात 80 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांचे भाजपच्या तिकीटासाठी प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या काही इच्छुकांची मुंबईवारी सुरु आहे, तर काहींचं मिशन उमेदवारीसाठी बायोडाटा, वशिलेबाजी आणि भेटीगाठीचं सत्र जोरात सुरु आहे. उमेदवारीसाठी मुंबईत येवू नका, असं मुख्यमंत्र्यांनी सांगूनही भाजपच्या तिकीटासाठी नागपूरातील अनेक इच्छुकांची मुंबईवारी सुरु आहे.

भाजप प्रमाणेच नागपुरात काँग्रेस उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. उमेदवारी निश्चित होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. त्यामुळेच काँग्रेस इच्छुकांनी त्यांचे प्रयत्न वाढवले आहेत. त्यापैकीच एक आहेत प्रमोद मानमोडे, काँग्रेसच्या तिकीटासाठी त्यांचे दिल्लीदरबारी प्रयत्न सुरु आहेत आणि त्यांच्या भेटीगाठीलाही वेग आला आहे.

‘अभी नही तो कभी नही’, असं म्हणत काँग्रेस आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. उमेदवारी निश्चित करण्यापूर्वी काँग्रेस आणि भाजपने सर्व्हे केला. सर्व्हेतील रिपोर्टच्या आधारावरच तिकीट देणार, असंही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं. पण तरीही उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचीही चर्चा आहे, त्यामुळे धाकधूक वाढलेले आमदारही पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

संबंधित बातम्या :

दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही, 27 तारखेला स्वत: ईडी कार्यालयात जाणार : शरद पवार

मुख्यमंत्र्यांसमोर शशिकांत शिंदे म्हणाले, आमची निष्ठा शरद पवारांवर, उद्धव ठाकरेंकडून शब्द, सूडाने वागणार नाही!

ईडीकडून झाडाझडती, चौकशीचे तीन टप्पे, दुसरा टप्पा अजित पवार, तिसरा टप्पा शरद पवार, पहिला कोण?

छगन भुजबळांविरुद्ध आणखी दोन कलमं वाढवली, दोषी आढळल्यास जन्मठेपेची तरतूद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *