चंद्रशेखर बावनकुळेंचा पत्ता कट केल्याने नागपुरात भाजपला मोठा फटका?

भाजपचे वरिष्ठ नेते आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका (BJP lost 6 seats in nagpur) बसला आहे, अशी चर्चा सध्या विदर्भात सुरु आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंचा पत्ता कट केल्याने नागपुरात भाजपला मोठा फटका?

नागपूर : भाजपचे वरिष्ठ नेते आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका (BJP lost 6 seats in nagpur) बसला आहे, अशी चर्चा सध्या विदर्भात सुरु आहे. बावनकुळे हे नितीन गडकरी गटातले असल्यामुळे त्यांचा पत्ता कट (BJP lost 6 seats in nagpur) झाला असल्याचे मतही काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

विदर्भ हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. विदर्भात भाजपचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे. गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने सर्वाधिक 40 जागांवर विजय मिळवला होता. मात्र तेली समाजाची मतं फिरल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 30 जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे भाजपचा गड आणि आरएसएस मुख्यालय असेलल्या नागपुरात भाजपच्या सहा जागांवर पराभव झाला आहे.

विदर्भात तेली समाजाची मतं फिरली

चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेली समाज भाजपसोबत होता. पण बावनकुळे तसेच इतर तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका बसला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतही नितीन गडकरी तेली समाजाच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितले.

विदर्भातली प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी 30 हजार आणि जास्तीत जास्त 70 हजार तेली समाजाची मतं आहेत. मात्र ही मतं यंदा भाजपला खेचता आली नाही. तर काँग्रेसने सर्वाधिक तेली समाजाच्या नेत्यांना उमेदवारी देत विदर्भात आपला दबदबा निर्माण करण्याच प्रयत्न करत दहा जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही मताधिक्यामध्ये घट झाली आहे, असंही राजकीय विश्लेषकांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात सहा जागांवर भाजपचा पराभव

एकट्या नागपूर जिल्ह्यात सहा जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. त्याशिवाय भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यातही भाजपला मोठा फटका बसला आहे.

विदर्भात सर्वाधिक फटका

2014 च्या निवडणुकीत भरभरुन देणाऱ्या विदर्भाची, यंदा भाजपवर वक्रदृष्टी पडल्याचं चित्र आहे. कारण 2014 मध्ये विदर्भातील 62 जागांपैकी तब्बल 44 जागी एकट्या भाजपने विजय मिळवला होता. त्यावेळी शिवसेनेसोबत भाजपची युती नव्हती. 2014 मध्ये शिवसेनेला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या.

2019 मध्ये भाजपला विदर्भात सर्वात मोठा फटका बसला. यंदा विदर्भात भाजपला केवळ 30 जागांवर आघाडी घेता आली. काँग्रेसने गमावलेल्या या आपल्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारत जवळपास 14 तर राष्ट्रवादीने 6 जागांवर आघाडी (BJP Seats in Vidhasabha 2019) घेतली.

विदर्भ (62) – 2014 मधील बलाबल

पक्ष जागा
भाजप 44
शिवसेना 04
काँगेस 10
राष्ट्रवादी 01
इतर 03
एकूण 62

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *