AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanth Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धक्कादायक निर्णय

Ekanth Shinde : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे.

Ekanth Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धक्कादायक निर्णय
Eknath Shinde
| Updated on: Feb 23, 2026 | 12:41 PM
Share

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वित्त खातं हे अजित पवार यांच्याकडे होतं. पण मागच्या महिन्यात बारामती येथे अजित पवारांवर काळाने घाला घातला. भीषण विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. आता त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना तसं पत्र दिलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादाजी भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नगर विकास विभागाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिली आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर आहे. अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पण अधिवेशन काळात येणाऱ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी या मंत्र्यांकडे खाते दिले आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच

राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखण्यात आली आहे. यंदाचा अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात होणार

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला जाईल. यामध्ये अजित पवार यांच्या आठवणींना आमदार उजाळा देतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून देतील.

अजित पवार यांच्या शोकप्रस्तावर कोण भाषण करणार?

विधानसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शोकप्रस्ताव मांडला जाणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रत्येक पक्षाचे गटनेते आणि तीन सदस्य अजित पवार यांच्या शोकप्रस्तावर भाषण करणार. प्रत्येक वेळी शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जातो आणि त्यांच्याकडूनच शोकप्रस्ताव वाचून दाखवला जातो. मात्र, काही सदस्यांकडून सभागृहात अजित पवार यांचा शोकप्रस्तावावर मत मांडण्याचा आग्रह होता.

Follow Us
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम