AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर मनसेनं खातं उघडलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं (First Victory of MNS in Assembly Election 2019) आहे.

अखेर मनसेनं खातं उघडलं
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 24, 2019 | 6:27 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं (First Victory of MNS in Assembly Election 2019) आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय (First Victory of MNS in Assembly Election 2019) मिळवला आहे. त्यांना 86233 मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना 80665 मते मिळाली आहेत.

मनसेने इतर पक्षांच्या तुलनेत काहीशी उशिराने विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. सुरुवातीला मनसे निवडणूक लढणार की नाही याबद्दल संभ्रम होता. मात्र, त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी समोर येत भूमिका स्पष्ट केली आणि निवडणूक लढण्याची घोषणा केली. राज ठाकरेंनी राज्यभरात मोजक्या ठिकाणी सभा घेत मनसेला राज्यातील सक्षम विरोधीपक्ष बनण्यासाठी जनमत मागितले. मात्र, या निकालात त्यांना दुपारपर्यंत खातंही खोलता आलं नव्हतं. अखेर कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील यांनी मनसेचं खातं उघडलं.

मनसेने या विधानसभा निवडणुकीत एकूण 110 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. त्यापैकी मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. मात्र, किती उमेदवार लढणार याची आकडेवारी सांगितली नाही. दररोज चार-पाच उमेदवारांची नावं जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी 110 उमेदवारांची नावं जाहीर केली.

राज ठाकरेंनी 2006 मध्ये शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली होती. तेव्हापासून राज ठाकरेंच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 2009 मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. 2014 मध्ये मनसेचा केवळ 1 आमदार निवडून आला.

मनसेची विधानसभा निवडणुकीतील उमेदवार यादी

  • प्रमोद (राजू) पाटील – कल्याण ग्रामीण
  • प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
  • अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
  • संदीप देशपांडे – माहिम
  • वसंत मोरे – हडपसर
  • किशोर शिंदे – कोथरुड
  • नितीन भोसले – नाशिक मध्य
  • राजू उंबरकर – वणी
  • अविनाश जाधव – ठाणे
  • नयन कदम – मागाठाणे
  • अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
  • नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
  • दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
  • योगेश शेवेरे- इगतपुरी
  • कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
  • संजय तुर्डे – कलिना
  • सुहास निम्हण – शिवाजीनगर
  • गजानन काळे – बेलापूर
  • अतुल बंदिले – हिंगणघाट
  • प्रशांत नवगिरे – तुळजापूर
  • राजेश वेरुणकर – दहीसर
  • अरुण सुर्वे – दिंडोशी
  • हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
  • वीरेंद्र जाधव – गोरेगाव
  • संदेश देसाई – वर्सोवा
  • गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
  • अखिल चित्रे- वांद्रे पूर्व
  • मंदार हळवे – डोंबिवली
  • प्राची कुलकर्णी – धुळे
  • जमील देशपांडे – जळगाव (शहर)
  • मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
  • अकलेश पाटील – अमळनेर
  • विजयानंद कुलकर्णी – जामनेर
  • रविंद्र फाटे – अकोट
  • विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
  • सुभाष राठोड – कारंजा
  • अभय गेडाम – पुसद
  • गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
  • सचिन पाटील – परभणी
  • विठ्ठल जवादे – गंगाखेड
  • प्रकाश सोळंखी – परतूर
  • संतोष जाधव – वैजापूर
  • नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
  • मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
  • महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
  • निलेश बाणखेले – ऐरोली
  • किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
  • सुनिल भारसकर (चांदीवली)
  • सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
  • विजय रावराणे – अणुशक्तीनगर
  • केशव मुळे – मुंबादेवी
  • संजय गायकवाड – श्रीवर्धन
  • देवेंद्र गायकवाड – महाड
  • प्रकाश रेडकर – सावंतवाडी
  • भाऊसाहेब पगारे – श्रीरामपूर
  • वैभव काकडे – बीड
  • शिवकुमार नगराळे – औसा
  • हनुमंत भोसले – मोहोळ
  • मधुकर जाधव – अक्कलकोट
  • मनिषा करचे – माळशिरस
  • गणेश कदम – गुहाघर
  • मनोज बाव्वनगडे – उंबरेड
  • महालिंग कंठाडे – राजुरा
  • युवराज यडुरे – राधानगरी
  • सुमेत भंवर – अंबरनाथ
  • सुनिल निभाड – डहाणू
  • दिनकर वाढान – बोईसर
  • संतोष नलावडे – शिवडी
  • जुईली शेंडे – विलेपार्ले
  • विनोद राठोड – किनवट
  • डॉ. अरुण देशमुख – फुलंब्री
  • अॅड. रामराव वानखेडे – उमरखेड
  • संदीप जळगावकर, भांडुप पश्चिम
  • विनोद शिंदे, विक्रोळी
  • हर्षदा राजेश चव्हाण, मुलुंड
  • आनंद प्रभू, वडाळा
  • अतुल भगत, उरण
  • के. के. कांबळे, पिंपरी
  • हरीष सुतार, मिरा भाईंदर
  • नागेश चव्हाण, बार्शी
  • जयवंत बगाडे, सांगोला
  • समता भिसे, कर्जत-जामखेड
  • अविनाश सौंदाळकर, राजापूर
  • नितीन देशमुख, मुरबाड
  • राजेंद्र भोसले, बदनापूर
  • वैशाली जाधव, विक्रमगड
  • उमेश गोवारी, पालघर
  • संदीप पाचंगे, ओवळा-माजिवाडा
  • जालिंदर कोकणे, उमरगा
  • मनिषा सरोदे, पुणे कॅन्टोनमेंट
  • मनोज खराबी, खेड-आळंदी
  • वैभव बाणखेले, आंबेगाव
  • कैलास नरके, शिरुर
  • सचिन कुलथे, दौंड
  • पुरंदर, उमेश जगताप
  • अनिल मातेरे, भोर
  • राकेश जाधव, चाळीसगाव
  • प्रफुल्ल ठाकूर, वसई
  • सिद्धांत मंडाले, देवळाली
  • अर्जुन वाघमारे, लातूर ग्रामीण
  • पूजा ठवकर, भंडारा
  • रमेश राजूरकर, वरोरा
  • निलेश सुरळकर, भुसावळ

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या