राज्यभरात 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध 

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर 798 उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते नामंजूर झाले (Valid candidate  for assembly election) आहेत.

राज्यभरात 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध 
Follow us
| Updated on: Oct 06, 2019 | 8:26 AM

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल (5 ऑक्टोबर) राज्यभरात छाननी (Valid candidate  for assembly election) करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले (Valid candidate  for assembly election) आहेत. तर 798 उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते नामंजूर झाले (Valid candidate  for assembly election) आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.

आज छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 56 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 75 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 101 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 60 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

त्याशिवाय अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 151 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 59 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 181 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 66 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 71 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 90 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 125 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

तसेच नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 327 उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 54 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 81 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 133 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 208 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 212 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 69 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 251 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 25 मतदारसंघात 272 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 84 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान यात वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती दर्शवलेली (Valid candidate  for assembly election) नाही.

तर रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 112 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 372 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 182 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 202 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 120 उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 82 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 237 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 108 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 40 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 27 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 186 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 111 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.