मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अमोल कोल्हेंची शिष्टाईनंतर प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे खासदार खासदार उदयनराजे भासले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) चांगलाच धक्का बसला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीने खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाठवले. मात्र, अमोल कोल्हेंची शिष्टाई अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे. उदयनराजेंसोबत प्रदिर्घ चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हेंनी आपण छत्रपतींचे मावळे असून मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अमोल कोल्हेंची शिष्टाईनंतर प्रतिक्रिया

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार खासदार उदयनराजे भासले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) चांगलाच धक्का बसला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीने खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाठवले. मात्र, अमोल कोल्हेंची शिष्टाई अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे. उदयनराजेंसोबत प्रदिर्घ चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हेंनी आपण छत्रपतींचे मावळे असून मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश आता जवळजवळ निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादीने केलेला अखेरचा शिष्टाईचा प्रयत्न देखील निकामी ठरला.

उदनराजे भोसले यांनीही आपल्या राजकीय वाटचाली विषयी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी माझ्या अटींवर प्रवेश करेन. मी काय करावं हे कुणी दुसरं सांगू शकत नाही. मला काय करायचं ते मी ठरवणार आहे. मला शोभेल असं आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास मी निर्णय घेईन. शेतकऱ्यांसाठी विमा योजनेची अट आहे. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. त्यांनी ठरवावं आणि मला सांगावं. जायचं असेल तर हो, नसेल तर नाही.”

उद्योग बंद पडत आहेत. त्यांना पुन्हा कसं सुरू करता येईल, यावर विचार करावा लागेल. अन्यथा भारतावर दिवाळखोरीची वेळ येईल. आपण पैसे कोठून आणणार? आपण पैशाचं नाटक करू शकत नाही, असंही उदयनराजे यांनी सांगितलं.

‘नोटबंदी, जीएसटीवर आजही माझी नाराजी’

नोटबंदी आणि जीएसटीवर त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी आपण आजही नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर नाराजच असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “नोटाबंदीनं ग्रामीण भागातील गरिबांच्या आयुष्याची कमाई उद्ध्वस्त केली. आपल्या देशातील नागरिकांची स्थिती लक्षात घ्यायला हवी. देशातील निम्म्याहून अधिक लोकांना बँकिंग क्षेत्राविषयी फारशी माहिती नाही. शहरात काहीशी वेगळी स्थिती मात्र, काही ठिकाणी घरात टीव्ही देखील नाही. त्यांना काय कळणार? त्यामुळे नोटा बंद करताना थोडा तरी विचार करायला हवा होता.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *