पावसामुळे निवडणूक कर्मचारी हैरान, मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत

राज्यात विधानसभेसाठी सोमवारी 21 ऑक्टोबरला सर्वत्र मतदान पार पडत आहे (Maharashtra Vidhansabha Election). मात्र, या मतदानावर पावसाचं सावट आहे (maharashtra rain). मुंबई उपनगरांसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत.

पावसामुळे निवडणूक कर्मचारी हैरान, मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत

मुंबई : राज्यात विधानसभेसाठी सोमवारी 21 ऑक्टोबरला सर्वत्र मतदान पार पडत आहे (Maharashtra Vidhansabha Election). मात्र, या मतदानावर पावसाचं सावट आहे (Maharashtra Rain). मुंबई उपनगरांसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अदांज वर्तवला आहे.

राज्याच्या अनेक भागात 23 तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती (Maharashtra Rain During Election), हवामान विभागाने दिली. त्याचबरोबर कोकण गोव्यासह काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानावर याचा परिणाम पाहायला मिळू शकतो (Maharashtra Rain During Election). पावसामुळे मतदानाच्या टक्केवारीवर विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच, पावसामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडतोय, त्यामुळे मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडतोय. राज्यात कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात रविवार पासून बुधवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. मराठवाड्यात सोमवारी आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, त्यानंतर 23 आणि 24 ऑक्टोबरला पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

विदर्भातही रविवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. 21 आणि 22 ऑक्टोबरला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही दोन दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने राज्याच्या अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मध्य महाराष्ट्र कोकण आणि घाट भागात तर पाऊस पडतच आहे माञ घाट परिसरात त्याचबरोबर भूपृष्ठावर काही ठिकाणी अतिवृष्टी चा इशारा आहे. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर रात्री पावसाचा जोर वाढेल.

21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी दिवसभर पावसाची शक्यता आहे. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. दुपारी आणि संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर सकाळच्या सत्रात पाऊस थोडा कमी राहील.

विदर्भात मतदानावर पावसाचं सावट

विदर्भातही मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता आहे. नागपुरात मतदानासाठी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं. मात्र, शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे मतदान केंद्रावर सर्वत्र चिखल साचला होता. चिखलामुळे साहित्य वाटप केंद्रात उपकरणं आणि इतर साहित्य तपासताना त्रास सहन करावा लागत आहे.

सांगलीत निवडणूक कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत

सांगली जिल्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. सांगलीत 23 लाख 74 हजार मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. मात्र, पावसामुळे निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिखलमय परिसरातून तारेवरची कसरत करत मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं लागत आहे. पाऊस झाला असला, तरी निवडणूक यंत्रणेवर कोणताही परिणाम झालेला नाही, निवडणूक यंत्रणा सुरळीत पार पडत आहे.

कोल्हापुरातही पाऊस, प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ

कोल्हापूरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसतो आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने आपली दमदार बॅटिंग सुरु ठेवली आहे. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास काळोख दाटून आल्याने शहरासह जिल्ह्यात अंधार पसरला. काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *