2009 ते 2019, राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिका

2009 ते 2019, राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिका

गेल्या 13 वर्षात मनसेच्या वाटचालीत टप्प्याने (Raj Thackeray Political Journey) राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करण्यापर्यंत अनेक भूमिका मांडल्या.

Namrata Patil

| Edited By: सचिन पाटील

Oct 11, 2019 | 11:20 AM

मुंबई : उत्कृष्ट वक्तृत्व, आक्रमकपणा, राजकारणाची उत्तम जाण, पॉलिटिकल टायमिंग साधण्यात पटाईत अशी ओळख असलेले नेते (Raj Thackeray Political Journey) म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या (Raj Thackeray Political Journey) आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत दोन प्रचारसभांचे आयोजन (Raj Thackeray Political Journey) केले होते. या दोन्ही प्रचारसभेत त्यांनी “मला विरोधी पक्ष होण्याची संधी द्या” असे आवाहन मुंबईकरांना केले.

“राज्याला एका कणखर विरोधी पक्षाची गरज आहे. असा विरोधीपक्ष नेता जो सरकारला नामोहरम करू शकतो. प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आज समोर आलो आहे. मला विरोधी पक्ष होण्याची संधी द्या. आता पर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने ही मागणी केली नाही ती मी आज करतोय, असं राज ठाकरे आज (10 ऑक्टोबर) खारमध्ये झालेल्या सभेत म्हणाले.”

“आजच्या घडीला सर्व राजकीय स्थिती पाहता, मला माझा आताचा अवाका माहीत आहे. विनाकारण जाऊन उंटाच्या ढुंगणाचा मुका कोण घेत बसणार. आपल्या आपल्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत, सत्ता नको, प्रबळ विरोधीपक्ष म्हणून संधी द्या, असंही राज ठाकरे म्हणाले.”

गेल्या 13 वर्षात मनसेच्या वाटचालीत टप्प्याने (Raj Thackeray Political Journey) राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करण्यापर्यंत अनेक भूमिका मांडल्या.

गेल्या 13 वर्षातील राज ठाकरे यांच्या काही राजकीय भूमिका

 • राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. यानंतर मनसेने लढवलेल्या पालिकेसह इतर निवडणुकांमध्ये राज यांनी मला पूर्ण सत्ता द्या, बघा मी महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करतो अशी भूमिका अनेकदा घेतली.
 • यानंतर 4 ऑगस्ट 2011 मध्ये मोदींच्या आमंत्रणांनंतर राज यांनी गुजरात दौरा केला. त्या दौऱ्यानंतर राज यांनी अनेक सभांमध्ये नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधान पदासाठी एकमेव लायक उमेदवार अशी भूमिका घेतली होती.
 • त्याशिवाय 2014 लोकसभेवेळी अनेक प्रचार सभांमध्ये त्यांनी नरेंद्र मोंदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधान पदासाठी एकमेव लायक उमेदवार असेही राज ठाकरे म्हणाले होते.
 • त्याचवर्षी 2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज यांनी मी विधानसभा निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली होती. मात्र मनसेला फक्त एकच जागा जिंकता आली.
 • यानंतर डिसेंबर 2016 मध्ये राज ठाकरे यांनी एका सभेतील भाषणादरम्यान मोदींची स्तुती केली होती. पंतप्रधान मोदी हे देशाची शेवटची आशा आहेत असेही राज ठाकरे म्हणाले होते.
 • फेब्रुवारी 2017 मधील महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 7 फोनही केले. मात्र शिवसेनेने याला दाद दिली नाही.
 • 2017 मध्ये पालिका निवडणुकीतील पराभवानंतर हा आपला शेवटचा पराभव अशी भूमिका घेतली होती. मनसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात राज यांनी हे वक्तव्य केलं.
 • एप्रिल 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र राज यांचे सूर अचानक बदलले. राज यांनी लोकसभा न लढता मोदी आणि अमित शहांविरोधात प्रचार केला. तसेच त्यांनी अप्रत्यक्ष रित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.
 • त्याशिवाय 2019 एप्रिल महिन्यात आयोजित केलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून संधी द्या असेही सांगितले होते.
 • ऑगस्ट 2019 मध्ये राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली.
 • सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या (ऑक्टोबर 2019) रणधुमाळीत राज यांनी विरोधी पक्षासाठी मला निवडून द्या अशी भूमिका मांडली. राज्याला एका कणखर विरोधी पक्षाची गरज आहे. असा विरोधीपक्ष नेता जो सरकारला नामोहरम करू शकतो. प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आज समोर आलो आहे. मला विरोधी पक्ष होण्याची संधी द्या असे राज ठाकरे मुंबईतील सभांमध्ये म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें