AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तरुण भारत’ माहित नसणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’, मुखपत्रांमध्ये कलगीतुरा

तरुण भारत' माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे' आहेत, अशा शब्दात 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून राऊतांचा समाचार घेण्यात आला आहे.

'तरुण भारत' माहित नसणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे', मुखपत्रांमध्ये कलगीतुरा
| Updated on: Nov 05, 2019 | 8:29 AM
Share

नागपूर : शिवसेना आणि भाजपमध्ये रंगणारी खडाजंगी कमी होती की काय, म्हणून आता शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ आणि रा. स्व. संघाचे मुखपत्र ‘तरुण भारत’ यांच्यामध्येही कलगीतुरा रंगत आहे. ‘तरुण भारत’ माहित नाही, असं म्हणणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’ आहेत, अशा शब्दात ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून राऊतांचा समाचार (Tarun Bharat on Sanjay Raut) घेण्यात आला आहे.

एका अग्रलेखावरुन एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल, की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं, असा टोला संजय राऊत यांना लगावण्यात आला आहे. तरुण भारत माहिती नाही, असं सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणाऱ्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल, असा टोमणाही संजय राऊत यांना मारण्यात आला आहे.

‘रोज अग्रलेख लिहा, 9 वाजता पत्रकार परिषद घ्या, ‘विक्रम-वेताळ’नंतर आता ‘उद्धव-बेताल’ची कथा’

महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रुपाने प्रश्न विचारत आहे आणि त्याची उत्तरं देणं सोडून आपलं अज्ञान प्रगट करण्याचं काम होत आहे. आता यांच्या 175 आमदारांच्या पाठिंब्यावर खुद्द शरद पवार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, असं म्हणत ‘तरुण भारत’मधून राऊतांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात आली आहे.

संपादक हा वाचकसंख्येचा लोकप्रतिनिधी असतो. त्यांची जनभावना टिपणे आणि ती सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण करुन घेणे, हे संपादकांचे आद्यकर्तव्य असते, असं सांगत संजय राऊत यांना वृत्तपत्राच्या संपादकपदाच्या जबाबदारीचीही आठवण करुन देण्यात आली आहे.

‘रोज अग्रलेख लिहिणं आणि नंतर 9 वाजता पत्रकार परिषद घेत फिरणं, बातम्या पेरणं यामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा कारभार चालवून दाखवणं यामध्ये अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?’ असा टोला संजय राऊत यांना काल ‘तरुण भारत’ मधून (Tarun Bharat on Sanjay Raut) लगावण्यात आला होता. त्यानंतर ‘तरुण भारत’ हे वृत्तपत्र आपल्याला माहिती नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.