PM KISAN : बॅंक खात्यावर 10 वा हप्ता अन् नंतर 10 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ‘हा’ संदेश…! वाचा सविस्तर

ग्रामीण भागात कुणाला हप्ता जमा झाला याचा कानोसा घेण्यातच दंग आहेत. या दरम्यान, चर्चेचा विषय ठरत आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एसएमएस' चा. हा 2 हजाराचा हप्ता जमा झाल्यानंतर एसएमएस हा येतोच पण या हप्त्याच्या दरम्यान वेगळाच संदेश मिळालेला आहे.

PM KISAN : बॅंक खात्यावर 10 वा हप्ता अन् नंतर 10 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर 'हा' संदेश...! वाचा सविस्तर
पीएम किसान सन्मान योजनेसाठीची नोंदणी आता मोबाईलद्वारेही करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 4:10 PM

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. 2 हजार रुपयांप्रमाणे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुणाला हप्ता जमा झाला याचा कानोसा घेण्यातच दंग आहेत. या दरम्यान, चर्चेचा विषय ठरत आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एसएमएस’ चा. हा 2 हजाराचा हप्ता जमा झाल्यानंतर एसएमएस हा येतोच पण या हप्त्याच्या दरम्यान वेगळाच संदेश मिळालेला आहे. नववर्षाच्या शुभेच्छां बरोबरच या योजनेच्या निधीचा उपयोग शेतीची उपकरणे घेण्यासाठी होईल तसेच एक लिंक देण्यात आली असून यावर क्लिक करुन नैसर्गिक शेती कशी केली जाते हे बघण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरु आहे.

काय आहे SMS मध्ये ?

पंतप्रधान मोदी यांनी पाठवलेल्या SMS मध्ये शेतकऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन या निधीचा वापर हा शेती उपकरणांसाठी करण्याचे आवाहन केले आहे. तर नैसर्गिक शेती पध्दत पाहण्यासाठी दिलेली लिंक पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभुधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा उद्देश साध्य होत असल्याचेही यावेळी मोदी यांनी सांगितले.याच रणनीतीचा एक भाग म्हणून सरकारने एकाच वेळी नैसर्गिक शेती पध्दत ही 10 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने हा एसएमस पाठवलेला आहे.

PM Kisan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती वाढवण्याचे आवाहन केले आहे. असा एसएमएस शेतकऱ्यांना पाठवलेला आहे.

तर समजा खात्यावर पैसे जमा होणार

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पैसे खात्यावर वर्ग करुन तीन दिवस झाले आहेत. या योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये आले नसतील आणि एसएमएस मध्ये केवळ FTO असेच दाखवत असेल तर समजा की रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरु आहे. आणि फंड ट्रान्सफर ऑर्डर असा एसएमएस असेल, तर पैसे हस्तांतरित झाल्याचे समजून घ्या. उर्वरीत लाभार्थ्यांना एक-दोन दिवसामध्ये हा निधी खात्यावर जमा होणार आहे. फंड ट्रान्सफर ऑर्डर असा संदेश असेल तर एकतर हप्ता रक्कम ही प्रक्रियेत आहे किंवा खात्यावर जमा झाली. जर तुमची आधार कार्ड पडताळणी झाली नसेल, तर मात्र, पैसे जमा होण्यास उशिर होणार आहे.

असे पहा पैसे जमा झाले का नाही?

– पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/. – आपल्या उजव्या कॉर्नरमध्ये Beneficiary Statu’च्या पर्यायावर क्लिक करा. – मग बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांक यापैकी कोणताही नंबर येथे नमूद करा. – त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक सर्व माहिती तुमच्या समोर येणार आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural University : ‘या’ 9 पिकांना अन् 4 फळांच्या वाणांना मान्यता, कोणत्या कृषी विद्यापीठाचे योगदान? वाचा सविस्तर

नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत असं काय घडलं ? ऐन हंगामात हळदीचे व्यवहार बंद पडले

Market Price : नववर्षात सोयाबीनच्या वाढत्या दराने शेतकऱ्यांना दिलासा, विक्री की साठवणूक ! वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.