Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठीच्या वाढीव अनुदानाची घोषणा अन् अंमलबजावणीसाठी 200 कोटींचा निधीही

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठीच्या वाढीव अनुदानाची घोषणा अन् अंमलबजावणीसाठी 200 कोटींचा निधीही
राज्य कृषिमंत्रा दादा भुसे यांनी मंत्रिमंडळात बैठक घेऊन या वर्षासाठी ठिबक सिंचन योजनेसाठी आवश्यक निधीची पूर्तता केली आहे.

पाण्याचा अपव्यव होऊ नये त्याचा योग्य वापर व्हावा या दृष्टीकोनातून ठिबक सिंचनाला अनुदान दिले जात होते. शिवाय याचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा याकरिता अनुदनाची रक्कम थेट 80 टक्क्यांवर केल्याची घोषणा राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वीच केली होती. केवळ घोषणाच नाही तर आता अंमलबजावणीसाठी 200 कोटीं रुपये निधी उपलब्ध असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 07, 2022 | 1:22 PM

मुंबई : बदलत्या काळाप्रमाणे शेतीव्यवसयातही अमूलाग्र बदल व्हावा याकरिता केंद्र आणि (State Government) राज्य सरकार हे प्रयत्नशील आहे. पाण्याचा अपव्यव होऊ नये त्याचा योग्य वापर व्हावा या दृष्टीकोनातून (Drip Irrigation) ठिबक सिंचनाला अनुदान दिले जात होते. शिवाय याचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा याकरिता (Subsidy Amount) अनुदनाची रक्कम थेट 80 टक्क्यांवर केल्याची घोषणा राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वीच केली होती. केवळ घोषणाच नाही तर आता अंमलबजावणीसाठी 200 कोटीं रुपये निधी उपलब्ध असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

असे असणार अनुदानाचे स्वरुप

राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे घेतला. त्यानुसार प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकन्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान व इतर शेतकन्यांना मिळणाऱ्या 45 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा रितीने सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 75 व 80 टक्के अनुदान मिळणार आहे. सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता पूरक अनुदान देण्यासाठी लागणारा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे.

शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत

राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीतून सन 2021-22 या वर्षामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. 75 टक्के व 80 टक्के अनुदानाचा लाभ झाल्यामुळे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच यामुळे राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसे यांनी केले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.

*यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल. * यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Rate : कापसाच्या विक्रमी दराला वस्त्रद्योग लॉबीचा अडसर, आता केंद्र सरकारची भूमिका महत्वाची

नाशिक पाठोपाठ सांगली द्राक्ष बागायतदारांचा महत्वाचा निर्णय, काय आहे द्राक्ष दर निश्चितीचे धोरण?

राज्य सरकारचा मोठा निर्णय : 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये उभारले जाणार हवामान केंद्रे, नेमका काय होणार फायदा?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें