पुन्हा पावसाचा अंदाज, रब्बीसह खरिपातील पिकांची ‘अशी’ घ्या काळजी..!

खरिपाचे तर पावसाने नुकसान झालेच आहे पण यंदा रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय येत आहे. राज्यात पुन्हा उद्यापासून (रविवार) आठ दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे खरिपातील तूर आणि कापसावरचा धोका हा कायम आहे तर रब्बीच्या पेरण्या अणखीन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुन्हा पावसाचा अंदाज, रब्बीसह खरिपातील पिकांची 'अशी' घ्या काळजी..!
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 12:46 PM

लातूर : खरिपाचे तर पावसाने नुकसान झालेच आहे पण यंदा रब्बी (Rabbi Season) हंगामाच्या सुरवातीलाच (Nature) निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय येत आहे. राज्यात पुन्हा उद्यापासून (रविवार) आठ दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे खरिपातील तूर आणि कापसावरचा धोका हा कायम आहे तर रब्बीच्या पेरण्या अणखीन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर पंधरा दिवसांनी अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने (Rain forecast) पावसाचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे शेतीव्यवसयाचे चक्रच बदलते की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे.

हवामानाच्या अचानक बदलामुळं रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या ढगाळ वातावरणाचा आणि पावसाचा परिणाम हा मुख्यत्वे शेती व्यवसायवर होणार आहे. कारण अजूनही खरिपातील तूर आणि कापूस ही मुख्य पिके वावरातच आहेत. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार असून किडीचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस हा नुकसानीचाच ठरणार आहे.

रब्बी हंगामाचे कसे करावे नियोजन

यंदा पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या होत्या. नोव्हेंबर महिन्याचा पंधरवाडा उलटला तरी केवळ ज्वारी आणि करडईचीच पेरणी झालेली आहे. तर गहू, हरभरा या पिकांचा पेरा अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीची गडबड न करता वातावरण निरभ्र झाल्यावरच पेरणी करावी अन्यथा पेरणी करुनही मोडणी करण्याची नामुष्की ओढावणार असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. तर पेरणी झालेल्या पिकांवर पावसाचा कसलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याच्या पेरणीला उशीर झाला तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होणार नाही. तर या पिकांच्या पेरण्या डिसेंबर अखेरपर्यंत केल्या तरी उत्पादनावर काही फरक पडणार नाही.

तूरीवरील मारुकाचे व्यवस्थापन

फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकणशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये.

कापसाला गुलाबी बोंडअळीचा धोका

ढगाळ वातावरणामुळे अंतिम टप्प्यात गुलाबी बोंडअळीचा धोका वाढला आहे. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यानही या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला होता. तर आता कापूस वेचणी सुरु असताना निर्माण झालेले चित्र शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनासाठी वेचणी न डावलता वेळेत वेचणीचे काम केले तरच कापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. अन्यथा सोयाबीनप्रमाणेच कापसाचेही नुकसान होणार आहे. शिवाय ‘बीटी’ची फवारणी करुन पिकाचे या वातावरणापासून संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.

खरिपातील पिकांना मात्र धोका

हंगामाच्या सुरवातीपासून खरीप हंगामावर निसर्गाचे संकट राहिलेले आहे. यापूर्वी सोयाबीन पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर आता तूर आणि कापूस ही खरिपातील पिके अंतिम टप्प्यात आहेत. सध्याच्या ढगाळ वातावरणाचा आणि उद्या पाऊस झाला तर त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. कापसावर मावा, तुडतुडी, फुलकिडे, गुलाबीबोंड अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तर तूरीवर शेंगमाशी आणि अळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तर मरीचे प्रमाण वाढल्याने थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या :

शेत रस्त्यांसाठी आता पानंद योजनेतून अनुदानही जाहीर, लवरच मिटणार शिवार रस्त्यांचा प्रश्न

कृषी सहायक पदाच्या परिक्षेला अखेर स्थगिती, काय आहे कारण ?

अतिवृष्टीच देणं ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत वाढ, रब्बी हंगामाला पोषक वातावरण

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.