रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणं मिळवायचंय, कृषी विभागाचं अर्ज करण्याचं आवाहन

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीनं रब्बी हंगाम 20201-22 साठी गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची बियाणे अनुदानावर मिळवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणं मिळवायचंय, कृषी विभागाचं अर्ज करण्याचं आवाहन
प्रतिकात्मक फोटो

मुंबई: यंदाचा खरिप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाचे वेध लागले आहेत. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीनं रब्बी हंगाम 20201-22 साठी गहू, ज्वारी, हरभरा या पिकांची बियाणे अनुदानावर मिळवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणं व पीक प्रात्याक्षिकासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अर्ज कुठं करायचा?

कृषी विभागानं सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी गहू, हरभऱ्याचं बियाणं अनुदान तत्वावर वाटप करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. सर्व शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर निश्चित करण्याचं आवाहन कऱण्यात आलंय. सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलंय. ऑनलाईन अर्ज करताना प्रमाणित बियाणे हा पर्याय निवडणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचं जमीन धारण क्षेत्र 2 हेक्टर पेक्षा कमी आहे. ते शेतकरी अर्ज करु शकतात. https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा. ८ अ चा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबूक ही कागदपत्रं अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे. याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटर, संग्राम कक्ष, सेतू केंद्र किंवा मोबाईल वरुन अर्ज दाखल करता येईल.

पीक पाहणी नोंदवण्याचं आवाहन

महाराष्ट्र सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरु केलं आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा 15 ऑगस्टला श्री गणेश झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ‌अ‌ॅपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. निफाड तालुक्यात देखील तहसीलदार शरद घोरपडे पीक पाहणी अ‌ॅपचा वापर करण्याचं आवाहन करत आहेत.

ई पीक पाहणी नोंदवण्यास 7 दिवस बाकी

ई पीक पाहणी अ‌ॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी अ‌ॅपमधून नोंदणीची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी गावोगावी जात शेतकऱ्यांना या ॲपद्वारे पिक नोंदणी करण्याचे आवाहन केलं आहे.

इतर बातम्या:

पाझर तलावाचे पाणी शेतात घुसले, दहा एकरांवरील लाखोंचे पीक वाहून गेले

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!

Agriculture Department appeal to farmers to apply for seed grant scheme

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI