AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोषक वातावरणामुळे रब्बीचा ‘राजा’ हरभराच, विक्रमी लागवड होणार

पोषक वातावरणाबरोबर कृषी विभगाचेही नियोजन शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. यंदाही शेतकऱ्यांचा बर हा हरबरा पिकावरच आहे.अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुमारे पावणेचार लाख हेक्टरपर्यंत हरभऱ्याची लागवड अपेक्षित धरली जात आहे. मराठवाड्यातही ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन हरभऱ्याचे उत्पादन वाढणार आहे.

पोषक वातावरणामुळे रब्बीचा 'राजा' हरभराच, विक्रमी लागवड होणार
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 1:27 PM
Share

अकोला : खरीप अंतिम टप्प्यात असून आता रब्बी हंगामाचे वेध लागलेले आहेत. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने यंदा रब्बीमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. पोषक वातावरणाबरोबर कृषी विभगाचेही नियोजन शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. यंदाही शेतकऱ्यांचा बर हा हरबरा पिकावरच आहे.अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुमारे पावणेचार लाख हेक्टरपर्यंत हरभऱ्याची लागवड अपेक्षित धरली जात आहे. मराठवाड्यातही ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन हरभऱ्याचे उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड विक्रमी होणार असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.

शिवाय हरभऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून पाठबळ मिळत आहे. पाऊस ओसरताच खरिपातील सोयाबीनची काढणी वेगाने होत आहे. सोयाबीनच्या खाली होणाऱ्या शेतात बहुतांश शेतकरी हरभऱ्याची लागवड करीत असतात. रब्बीत हरभऱ्याचे खात्रीशीर पिकही येत असल्याने दर वर्षी हा पेरा वाढतोच आहे. यंदा वऱ्हाडात पाऊसही अधिक झालेला आहे. शिवाय सर्वच प्रकल्पांमध्ये तुडुंब पाणी आहे. विहिरींची पातळीही वाढलेली असल्याने सिंचनासाठी पाण्याची अडचण राहलेली नाही. त्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात हरभऱ्याची 1 लाख 99 हजार हेक्टरपर्यंत लागवड अपेक्षित आहे. खरीपातील पिकांना पावसाचा फटका बसलेला होता. शिवाय सोयाबीनच्या क्षेत्रावर हरभऱ्याचीच लागवड केली जाते. यंदा खऱीपातील झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी अधिकच्या प्रमाणात केली जाणार आहे. बुलढाण्याबरोबरच अकोल्यातही हरभऱ्याचे उत्पादन हे वाढणार आहे. एकंदरीत हरभऱ्यासाठी पोषक वातावरण आणि पाण्याचे नियोजन झाल्याने यंदा हरभरा विक्रमी पेरला जाणार असल्याचे चित्र आहे.

रब्बी हंगामातील या पिकाचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार

रब्बी हंगामात यंदा शेतकऱ्यांचा भर हा हरभरा पिकावर राहणार आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाला प्राधान्य हे दिले जाणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत करडई, हरभरा, ज्वारी, जवस या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. याकरिता रामेश्वर ठोंबरे यांच्या 9420406901 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

बियाणांचे असे असणार आहेत दर

ज्वारी परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती या वाणाच्या चार बॅग ह्या एका शेतकऱ्यास मिळणार असून याची किमंत ही प्रतिबॅग 320 रुपये राहणार आहे. बीडीएनजीके 797 या वाणाचा हरभऱ्याची 10 किलोची बॅग 800 रुपयांना राहणार आहे. तर काबुली बीडीएनजीके 798 ही 10 किलोची बॅग ही 1000 रुपयांना राहणार आहे. करडई पी.बी.एन.एस 12 (परभणी कुसुम ) पी.बी.एन.एस 86 (पूर्णा) ही 5 किलोची बॅग 500 रुपयांना राहणार आहे. तर लातूर 93 वाणाचे जवस याची 5 किलोची बॅग ही 500 रुपयांना राहणार आहे.

खताच्या अनुदानात वाढ

यंदाच्या अर्थसंकल्पात खताच्या अनुदानासाठी 79 हजार 600 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यानंतर अतिरिक्त अनुदानानुसार या रकमेत वाढ झालेली आहे. तर रब्बी हंगामासाठी निव्वळ अनुदान रक्कम ही 28, 655 कोटी होती. जूनमध्ये खताचा आढावा घेऊन यामध्ये 14,775 कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना खताचा पुरवठा व्हावा हे सरकारचे धोरण असले तरी यामध्ये अडचणी आहेत. वेळेत खत मिळाले नाही तर त्याचा परिणाम हा थेट उत्पादनावर होणार आहे. (Agriculture department predicts increase in chickpea sector due to nutritious environment)

संबंधित बातम्या :

जनावरांच्या गोठ्यातूनच होतो लंम्पी आजार, प्रतिबंधात्मक उपायोजनेमुळे प्रादुर्भाव कमी

तुटपुंज्या नुकसानभरपाईचा ‘असा’ हा निषेध, सडलेल्या सोयाबीनची होळी

कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.