Agricultural : नुकसानभरपाईबाबत कृषीमंत्र्यांचे मोठे विधान, आता तरी होणार का पूर्तता..!

यंदा आर्थिक मदतीचे निकष बदलले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणार आहे. शिवाय पंचनामे आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे मदत ही दिली जाणारच आहे.

Agricultural : नुकसानभरपाईबाबत कृषीमंत्र्यांचे मोठे विधान, आता तरी होणार का पूर्तता..!
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
राजेंद्र खराडे

|

Sep 24, 2022 | 9:15 PM

नजीर पठाण टीव्ही9 परभणी : परभणीच्या दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे दिवसभर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहिले होते. सकाळच्या प्रहरी दौऱ्यावर येत असतानाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून नुकसानभरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला. तर नंतर भर सभेत त्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच फोन आला. असे असले तरी कृषीमंत्री या नात्याने शेतकऱ्यांना त्यांनी वचन दिले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, तो शेतकरी हा मदतीपासून वंचित राहाणार नाही. नुकसानभरापाईची घोषणा झाली आहे आता अंमलबजावणीही होणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण बागायत क्षेत्र देखील बाधित झाले आहे. त्यानुसार पंचनामे पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष नुकसानभरपाईला सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये

यंदा आर्थिक मदतीचे निकष बदलले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणार आहे. शिवाय पंचनामे आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे मदत ही दिली जाणारच आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंब होत असला तरी शेतकऱ्यांनी त्याबाबत चिंता करु नये असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

पंचनामे करताना काही चूक झाली का? याची देखील तपासणी केली जाणार आहे. शिवाय केवळ अधिकारीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले असे नाही तर आपणही शेतकऱ्यांशी संवाद साधून नेमकी स्थिती काय आहे याचा आढावा घेणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली म्हणजे त्याची पूर्तता करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भलेही उशिर होत असला तरी हा मदत लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न राहिल असेही कृषीमंत्री म्हणाले आहेत.

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे राज्यात 30 लाख हेक्टराहून अधिकची पिके ही बाधित झाली आहेत. नुकसान होताच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या अहवालानुसार आता मदत रकमेचे वितरण केले जाणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें