शेतकऱ्यांसाठी अलर्ट! 31 मार्चपूर्वी करा या दोन गोष्टी अन्यथा नुकसान होईल

31 मार्चपर्यंत शेतकर्‍यांना मूळ रक्कम ही 4 टक्के व्याजासह पैसे जमा करावे लागतील. अन्यथा 7 टक्के दराने व्याज आकारले जाईल. (Alert for farmers! Do these two things before March 31st otherwise it will loss)

नवी दिल्ली : पुढचे चार दिवस शेतकर्‍यांसाठी खूप महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत त्याच्याकडे दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. किसान क्रेडिट कार्डचे पैसे जमा करण्याची ही शेवटची तारीख आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पंतप्रधान-किसन) लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत आधार लिंक करावे लागेल. ही दोन्ही कामे केली नाहीत तर आर्थिक नुकसान सहन करण्यास तयार रहा. (Alert for farmers! Do these two things before March 31st otherwise it will loss)

किसान क्रेडिट कार्ड

आता केसीसीवर बँकेतून घेतलेल्या 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज परत करण्यास अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिले आहेत. 31 मार्चपर्यंत शेतकर्‍यांना मूळ रक्कम ही 4 टक्के व्याजासह पैसे जमा करावे लागतील. वेळेत पैसे परत केल्यामुळे बँकेत आपली विश्वासार्हता टिकून राहिल. अन्यथा 7 टक्के दराने व्याज आकारले जाईल.

शेतकर्‍यांना काळजी करण्याची गरज नाही. पैसे जमा केल्यानंतर 24 तासानंतर शेतकरी पुन्हा शेतीसाठी पैसे घेऊ शकता. जर आपण 31 मार्च पर्यंत पैसे जमा केले तर 1 एप्रिल रोजी आपण पुन्हा पैसे घेण्यास सक्षम असतील. यामुळे 31 मार्चपर्यंत 4 टक्के व्याजासह मूळ रक्कम जमा करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल आणि पैश्यांची परतफेड केल्यानंतर एका दिवसानंतर पुन्हा पैसे काढू शकतात.

केसीसीचा व्याज दर 9 टक्के

किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जाचा व्याज दर 9 टक्के आहे. पण त्यात सरकार 2% सबसिडी देते. त्यामुळे त्याचा दर 7 टक्के होतो. जे लोक वेळेवर पैसे परत करतात त्यांना 3 टक्के अधिक सूट मिळते. एकंदरीत, जर तुम्ही वेळेत बँकेत पैसे परत करत असाल तर 4 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारले जाणार नाही.

पंतप्रधान किसान योजनेसाठी आधार अनिवार्य

जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय व्यतिरिक्त देशाच्या इतर भागात 1 डिसेंबर 2019 पासून पंतप्रधान किसान योजनेत आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. बनावट लाभार्थींची ओळख केवळ आधार कार्डाने केली जात आहे. यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांनी चार दिवसांत आधारला या योजनेशी लिंक नाही केले तर 6000 रुपये मिळणार नाहीत. बँकांमध्ये आधार लिंकसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा आहेत. (Alert for farmers! Do these two things before March 31st otherwise it will loss)

 

इतर बातम्या

गबाळा, सॉक्सचा उग्र वास, पण आत्मविश्वासपूर्ण… विश्वास नांगरे पाटील आणि रुममेट माधवनच्या मैत्रीचे किस्से

Holi 2021 : भेसळयुक्त माव्याची करंजी तर खात नाही ना?; असा ओळखा चांगला मावा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI